Sunday, July 21, 2024

मयत, दहाव्याला पुढाऱ्यांनो तुमची भाषणं नको…’या’ गावाने लावला फलक….

दशक्रिया विधीला राजकीय नेत्यांची मोठी गर्दी होते, भाषणबाजी करीत एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जाते. दशक्रिया विधीला उपस्थित असलेले सर्वसामान्य नागरिक, मृत व्यक्तीच्या कुटुंबाचे नातेवाईक, कुटुंब अक्षरशः या भाषणबाजीला कंटाळले आहेत. हे चित्र सर्रास पाहायला मिळते. या भाषणबाजीला कंटाळून उरुळी कांचन (पुणे) येथील ग्रामस्थांकडून स्मशानभूमी परिसरात भाषण बाजीबंद करण्यासाठी बॅनर लावण्यात आले आहेत. हे बॅनर सगळ्याचे लक्ष वेधून घेत आहेत.

“मयत व दहावा हा त्या कुटुंबांसह नातेवाईकांसाठी खूप मोठा दुःखाचा प्रसंग असतो. सर्वांनी श्रद्धांजली वाहून राजकीय फायदा घेण्यासाठी लोकांना वेठीस धरणे थांबवले पाहिजे. उपस्थित असलेल्या एका ज्येष्ठाने श्रद्धांजली वाहून शेवट करत लोकांच्या भावनेशी खेळायचे बंद करावे. मयत आणि दहाव्यामधील भाषणे राजकीय पुढाऱ्यांनी बंद करून लोकांना सहकार्य करा,” असे बॅनर लिहिण्यात आले आहे. त्याखाली समस्त उरुळी कांचन ग्रामस्थ, असा देखील उल्लेख करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles