पुण्यात रविवारी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर खळबळ उडाली. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. कौटुंबिक आणि वर्चस्वाच्या वादातून वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली. पुणेपोलिसांनी याप्रकरणी त्यांच्या दोन सख्ख्या बहिणी आणि त्यांच्या मेहुण्यांना अटक केली आहे. वनराज यांची पाच गोळ्या झाडून आणि नंतर कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली. वनराज यांच्या हत्येमागे त्यांच्या कुटुंबियांचाच हात असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
वनराज आंदेकरांच्या हत्येमागे दोन सख्ख्या बहिणी….. मेहुण्यांनाही अटक
- Advertisement -