मकर संक्रांतीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोसेवा केली होती. त्यांनी गाईंना चारा खावू घातला होता. पंतप्रधान मोदी यांनी गोसेवा केली त्या गाई पुंगनुर जातीच्या आहेत.
पुंगनुर गाईंचं दूध खूप पौष्टिक असतं. या गाईच्या दूधामध्ये एयू पदार्थ आढळतो. सोन्याचे रासायनिक नाव एयूच आहे. आजही आंध्र प्रदेशमध्ये तिरुपती तिरुमालासह विविध मंदिरांमध्ये याच गाईंचं दूध खीर प्रसाद तयार करण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे मंदिर कार्यासाठी दूधाला मागणी जास्त असते. एका हिंदी वृत्तसंस्थेने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
पुंगनुर गाय दिसायला निरागस दिसते. तसेच खूप शांत स्वभावाची असते. या गाईंचा आकार छोटा असतो. त्यामुळे या गाईंना पाळणे सोप्पी गोष्ट असते. या गाईंची किंमत खूप जास्त आहे. माहितीनुसार, एका गायची किंमत एक लाख ते १० लाखांपर्यंत असू शकते. पंतप्रधान मोदी यांच्या दिल्लीच्या घरी ठेवण्यात आलेल्या गाई याच जातीच्या आहेत.