Thursday, March 20, 2025

विजय औटी व त्याच्या सहकाऱ्यांना तडीपार करा ! मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे मागणी

विजय औटी व त्याच्या सहकाऱ्यांना तडीपार करा

विधीज्ञ असिम सरोदे यांची मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे मागणी

पारनेर न्यायालयातील वकील व खा. नीलेश लंके यांचे सहकारी अ‍ॅड. राहुल बबनराव झावरे या जीवघेणा हल्ला करणा-या विजय औटी, त्याचा भाव नंदकुमार औटी व प्रितेश पानमंदद यांच्यावर संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत कायमस्वरूपी तडीपार करण्याची मागणी ज्येष्ठ विधीज्ञ असिम सरोदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.
सरोदे यांनी नमुद केले आहे की, फसवणूक करणे, सरकारी कामात अडथळा आणून अधिकाऱ्यांना मारहाण करणे, मयताच्या जमीनीची खरेदी विक्री करणे, जीवे मारण्याची धमकी देऊन खुनाचा प्रयत्न करणे, पदाचा दुरूपयोग करून नगरपंचायतमध्ये खोटया नोंदी करणे, बनावट कागदपत्रे तयार करून बँका, पतसंस्थांकडून कर्ज घेऊन औटी व त्याच्या सहकाऱ्यांनी आर्थिक गुन्हे केलेेले आहेत. विजय औटी व त्याच्या सहका-यांवर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल आहेत. विजय औटी याने त्याच्या पदाचा गैरवापर करून नगरपंचायतमध्ये केलेल्या खोटया नोंदीप्रकरणी पारनेर नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी पारनेर पोलीसांकडे विजय औटी व त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पत्र दिले असल्याचे सरोदे यांनी म्हटले आहे. दरम्यान, पारनेर नगर पंचायतचा अध्यक्ष असताना विजय औटी याने पाणीपुरवठा अभियांत्यास मारहाण केली होती. त्याप्रकरणी त्याच्यावर अभियंत्यास मारहाण तसेच सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे सरोदे यांनी म्हटले आहे.
विजय औटी व त्याचे सहकारी संघटीत गुन्हेगारी करून समाजात दहशतीचे वातावरण करीत असल्याने त्यांना कायमस्वरूपी तडीपार करणे गरजेचे असल्याची आग्रही मागणी सरोदे यांनी केली आहे. दरम्यान, महसूल विभागाने विजय औटी याच्या मालकीच्या खडी क्रशरला काही कोटी रुपयांचा दंड ठोठावला असून ही कारवाई देखील प्रलंबित असल्याचे सरोदे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
विजय सदाशिव औटी त्याचा भाऊ नंदू औटी, प्रितेश पानमंद, अंकुश ठुबे, नीलेश उर्फ धनू घुमटकर, संगम सोनवणे, नामदेव औटी, मंगेश कावरे, पवन औटी, प्रमोद रोहोकले, प्रथमेश रोहोकले, सुरेश औटी व इतर अनोळखी ३ ते ४ इसमांनी अ‍ॅड. राहुल झावरे यांच्यावर दि.६ जुन रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पारनेर शहरातील आंबेडकर चौकात प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेेले अ‍ॅड. झावरे हे आजूनही अतिदक्षता विभागात उपचार घेत असून त्यांच्यावरील काही शस्त्रक्रियाही अद्याप प्रलंबित आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles