पंजाब नॅशनल बँकेत सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. सायकोलॉजिस्ट पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. याबाबत अधिकृत वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे.पंजाब नॅशनल बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत. तुम्ही pnbindia.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात
पंजाब नॅशनल बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ७० वर्ष असावी. सायकोलॉजिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून सायकोलॉजिस्टमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन (M.A)पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे १० वर्षांचा अनुभव असायला हवा
सायकोलॉजिस्ट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दर महिन्याला १,००,००० रुपये पगार मिळतो. या नोकरीसाठी उमेदवारांना अतिरिक्त भत्ते आणि सुविधा दिले जातात.
पंजाब नॅशनल बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची निवड शॉर्टलिस्टिंग आणि इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही परिक्षेशिवाय सरकारी नोकरी मिळणार आहे.