एका तरुण इन्स्टाग्राम इन्फ्लुअन्सरने पोलिसांच्या वाहनात बसून रील शूट केले. या रीलमध्ये तिने अश्लिल आणि विचित्र हावभाव केले आहेत. तसंच, ती गाडीच्या बोनेटवरही बसली. धक्कादायक म्हणजे, पोलीस अधिकाऱ्यानेच तिला पोलीस वाहनाचा वापर करण्याची परवानगी दिली होती.
तिचा हा रील सोशल मीडियावर व्हायरल होताच जालंधरचे पोलीस आयुक्त कुलदीप चहल यांनी अशोक शर्मा या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई केली. सोशल मीडियासाठी रिल्स बनवण्याकरता मुलीला पोलिसांच्या अधिकृत वाहनाचा वापर करू दिल्याबद्दल संबंधित पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं.