Monday, July 22, 2024

नगर – मनमाड इलेक्ट्रीक डबल लाईन रेल्वे मार्ग प्रकल्पा अंतर्गत पुणतांबा ते कान्हेगाव नवव्या टप्प्याची चाचणी यशस्वी

नगर – मनमाड इलेक्ट्रीक डबल लाईन रेल्वे मार्ग प्रकल्पा अंतर्गत पुणतांबा ते कान्हेगाव नवव्या टप्प्याची मंगळवारी चाचणी यशस्वी
प्रतिनिधी- विक्रम लोखंडे
पुणतांबा ते कान्हेगाव चाचणी यशस्वी
ताशी 130 कि. मी वेगाने धावली रेल्वे
द्रुतगतीमुळे नगरचा रेल्वेप्रवास सुपरफास्ट !

केडगाव : नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत पुलतांबा ते कान्हेगाव या 8.66
कि .मी. अंतराची चाचणी मंगळवारी घेण्यात आली लवकरच नगर ते मनमाड पर्यंतचे हे काम पुर्ण होणार असुन यामुळे नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे . या पुर्ण मार्गात इलेक्ट्रीक इंजीनचा वापर होत आहे .गेल्या तीन वर्षापासुन नगर ते मनमाड द्रुतगती ( डबललाईन ) रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे . या पुर्वि कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई , अंकाई ते अंकाई किल्ला ,अंकाई किल्ला ते मनमाड ,कोपरगाव ते कान्हेगाव,बेलापूर ते पुणतांबा,बेलापूर ते पढेगाव,निबळक ते वांबोरी
या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. आता मंगळवारी ( दि. 2 ) रोजी 8 .66 कि .मी. डबल लाईन रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यात आली. आता ऐकूण 115 की मी अंतराची चाचणी पूर्ण घेतल्याची माहिती दीपक कुमार उप मुख्य अभियंता (बांधकाम) अहमदनगर ,यांनी दिली .

मनमाड ते दौंड रेल्वे मार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्वपुर्ण टप्पा येतो . मात्र हा मार्ग सिंगल लाईन असल्यामुळे रेल्वेगाडी चा वेग कमी होता . तसेच सिंगल लाईन मुळे अनेकदा रेल्वेगाड्यांना थांबा घ्यावा लागत होता . तासोनतास रेल्वे गाडी एकाच जाग्यावर थांबुन ठेवावी लागत . मात्र आता हा पुर्ण मार्ग इलेक्ट्रीक इंजीनचा वापर करून डबल लाईन करण्यात येत असल्यामुळे विनाकारण रेल्वेगाडयांचा थांबा आता बंद होणार आहे .पुणतांबा ते कान्हेगाव या द्रुतगती रेल्वे मार्गावर मध्ये गोदावरी नदी वरील लांबी 288 मीटर व उंची 18 मीटर लांबीचा असलेले सर्वात मोठा पुल बांधण्यात आला आहे.हा रेल्वे पुल बनवण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागला असून.नगर ते मनमाड रेल्वे द्रुतगती मार्गा मधील सर्वात मोठया लांबीचा व उंचीचा पूल असून या पुला मुळे नगर -मनमाड रेल्वे गाड्या धावण्यासाठी बळकटी मिळाली आहे.
तसेच या कामामुळे रेल्वे ताशी 130 प्रति किमी वेगाने धावणार असल्याने रेल्वेगाडी धावण्याचा वेगही सुपरफास्ट होणार आहे. तीन वर्षापासुन हे काम सुरू आहे .पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसऱ्या टप्प्यात नगर ते दौंड पर्यंत काम पुर्ण होणार आहे .मंगळवारी झालेल्या चाचणीत या द्रुतगती मार्गाचा नेमका वेग काढण्यात आला. नगर ते मनमाड पर्यतंचा टप्पा पुर्ण होण्यास अजुन एक वर्ष लागतील असा अंदाज आहे यावेळी ताशी 130 वेगाने धावली रेल्वे

या अधिकाऱ्यांच्या उपस्थीतीत पुणतांबा ते कान्हेगाव द्रुतगती लोहमार्गाच्या चाचणीसाठी घेतली.
रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्राशकीय अधिकारी ए के पांडे, मुख्य अभियंता राजकुमार वानखेडे, उप मुख्य अभियंता दीपक कुमार,कार्यकारी अभियंता डी पी पटेल,कार्यकारी अभियंता संदीप सिन्हा,सहाय्यक कार्यकारी अभियंता आर जे गायकवाड,सिनियर सेक्शन इंजिनिअर प्रगती पटेल,सेक्शन इजिनिअर धर्मेंद्र कुमार, सुद्धाशु कुमार, एक्झिकेटीव, इंजिनिअर व आदी उपस्थित होते
Untitled 2

मनमाड ते नगर डबल लाईन ( द्रुतगती ) रेल्वे मार्गाच्या नव्या टप्प्याची चाचणी मंगळवारी घेण्यात आली. यात रेल्वेगाडीचा नेमका वेग काढला आहे . या महत्त्वकांक्षी कामामुळे नगरला फायदा होणार असुन नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होईल .दीपक कुमार उप मुख्य अभियंता (बांधकाम) अहमदनगर यांनी सांगितले

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles