Pushpa 2सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा-२’ चित्रपटातील ‘अंगारो सा’ हे गाणं रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर इन्फ्ल्यूएन्सर, तसेच कलाकार थिरकताना दिसतायत. आता आसामधील एका इन्फ्ल्यूएन्सरने या गाण्यावरील एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ ‘aimoni_official’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या तरुणीनं अगदी हटके अंदाजात हा डान्स परफॉर्म केला आहे. डोक्यावर गुंडाळलेला कपडा, शर्ट व लुंगी अशा अगदी साध्या पोशाखामध्ये Aimoni दिसत आहे. एका बाजूला काम करीत तिनं या गाण्यावर डान्स केला आहे. या डान्समधली लक्ष वेधून घेणारी गोष्ट ठरली ती म्हणजे तिनं हा व्हिडीओ शेतजमिनीवर शूट केला आहे, जिथे ती भाताचा तरवा लावताना (भातशेती) दिसत आहे. भातशेती करीत ती या गाण्याच्या हूक-स्टेपदेखील करीत होती,https://www.instagram.com/reel/C80pQp4BEgz/?utm_source=ig_web_copy_link
- Advertisement -