दाक्षिणात्य चित्रपट ‘पुष्पा 2’ची सध्या सर्वत्र आहे. पुष्पाच्या यशानंतर आता चित्रपटाचा सिक्वेल पुष्पा २: द रुल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लु अर्जुन आणि रश्मिकाची केमिस्ट्री चाहत्यांना पाहायला मिळत आहे. यानंतर आता चित्रपटातील नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
काही दिवसांपूर्वी ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटातील पुष्पा पुष्पा गाणं लाँच झालं होतं. त्यानंतर आता अंगारो हे गाण प्रदर्शित झालं आहे. हे चित्रपटातील रोमँटिक गाणं आहे. अंगारो के अंबर सा मेरा सामी.. असं या गाण्याचे बोल आहेत. व्हिडिओत गाण्याचं मेकिंग दाखवण्यात आलं आहे. या गाण्यात रश्मिका आणि अल्लु अर्जुन हूक स्टेप करताना दिसत आहे. गाण्याचे लिरिक्स खूपच छान आहे.
‘अंगारो’ हे गाणा श्रेया घोषालने गायलं आहे. तर गाण्याचे नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केलं आहे. तेदेखील गाण्याच्या व्हिडिओत गाणं गाताना दिसत आहे. हे गाणं काही तासातच सोशल मीडियावर प्रचंड व्हायर झाला आहे ‘पुष्पा २’ चित्रपट १५ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पुष्पाप्रमाणेच पुष्पा २ चित्रपटाला खूप जास्त प्रतिसाद मिळेल, अशी आशा व्यक्ती केली जात आहे. चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका प्रमुख भूमिकेत तर फहद फासिल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.