स्टायलिश सुपरस्टार अल्लू अर्जूनचे चाहते त्याच्या आगामी पुष्पा 2 चित्रपटाटची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुष्पा 2 चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच याकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत. पुष्पा द रुल चित्रपटाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुष्पा द रुल चित्रपटाचं नवीन पोस्टर समोर आलं असून चित्रपटाची रिलीज डेटही जाहिर करण्यात आली आहे.
‘पुष्पा : द रूल’ चित्रपटासाठी चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या नवीन आणि नेत्रदीपक पोस्टरचे रिलीज केलं आहे. जसं काउंटडाऊन सुरू झालं आहे, तशी ‘पुष्पा : द रुल’साठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या नवीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
पोस्टरमध्ये आपण अल्लू अर्जुनला त्याच्या ‘पुष्पराज’च्या अवतारात दिसत आहे. ‘पुष्पा 2’ च्या नवीन पोस्टरसह टॅगलाइन आहे, ‘त्याचा रुल 100 दिवसांत पहा’. पुष्पा 2 चित्रपट आजपासून 100 दिवसांनी थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज आहे. पुष्पा 2 चित्रपटाच्या नवीन पोस्टरने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. यासोबतच चाहत्यांना आणि प्रेक्षकांना एक थरारक सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी टीम सज्ज झाली आहे.