पुष्पा द राइज’ या चित्रपटातील ‘मै झुकेगा नही साला’ हा डायलॉग खूप फेमस झाला होता. अनेक लोकांनी या डायलॉगवर वेगवेगळी रील केल्याचे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील यात शंका नाही. पण या डायलॉग म्हणत एका आरोपीने सर्वांसमोर गुन्हा कबूल केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो म्हणतोय की, मी खून करायला गेलो होतो पण खून करू शकलो नाही आणि त्यानंतर तो मी झुकणार नाही हा पुष्पा सिनेमातील डायलॉग म्हणतो.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांच्या गाडीत बसलेल्या आरोपीला जेव्हा मीडियावाले काही प्रश्न विचारतात तेव्हा तो म्हणतो, “मी काल खून करायला गेलो होतो पण मी तो केला नाही. मला चोर म्हणू नका मी चोरी करत नाही तर हिसकावून खातो” तसंच, माझं नाव पुष्पा आहे, मी झुकणार नाही असंही तो म्हणाल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तर या आरोपीला एका चोरीच्या घटनेत सहभागी असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, पोलिसांच्या गाडीत बसून तो जो डायलॉग म्हणला आहे त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
“चोरी नहीं मर्डर किया, मैं झुकेगा नहीं साला”
फ़िल्मों का ऐसा आतंक पहले शायद ही देखने मिला होगा। सिलीगुड़ी में लाखों की चोरी करने के बाद ख़ुद को पुष्पा बताता आरोपी। pic.twitter.com/SNVdgerICE
— Anurag Chaddha (@AnuragChaddha) September 26, 2023