Wednesday, April 24, 2024

हॉटेलमध्ये राडा, दगडफेक करून मालकाला मारहाण, चार जणांविरोधात गुन्हा दाखल नगर शहरातील घटना

अहमदनगर : हॉटेलमध्ये गोंधळ घालत दगडफेक करून मालकास मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.११) दुपारी तीन वाजेच्या सुमारास नगर-मनमाड रोडवरील शाही इन हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी चार जणांविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनू नेटके, नयन तांदळे, अक्षय माताडे, करण ससे (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. सावेडी, नगर) अशी गुन्हा
दाखल झालेल्या इसमांची नावे आहेत.

याबाबत अमरजितसिंग बक्षीसिंग शाही (रा. सहकार नगर, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी दुपारी ते घरी होते. त्यांचा मुलगा राजबीर हा हॉटेलवर होता. वरील आरोपींनी हॉटेलमध्ये गोंधळ घालत फिर्यादीच्या मुलाला मारहाण केली. काही वेळात फिर्यादी स्वत: शाही इन हॉटेलवर पोहोचले. त्यांनी तुम्ही गोंधळ घालू नका, असे म्हणत आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फिर्यादीला मारहाण केली.तसेच जवळच असलेले दगड उचलून हॉटेलच्या काचा फोडल्या. त्यामुळे फिर्यादीने हॉटेलचे शटर खाली केले. त्यानंतर आरोपींनी दगडफेक केली.यातील एक दगड फिर्यादीच्या डोक्याला लागला. त्यात ते जखमी झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles