मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा जनता दरबार नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. प्रशासनातील अधिकारी आणि नागरीक यांच्यात योग्य समन्वय साधण्याचा प्रयत्न जनता दरबारातून होत असतो. रविवारी तब्बल ८ तास चाललेल्या दरबारातून नागरीकांच्या प्रश्नांची सोडवणूक करीत मंत्री विखे पाटील यांनी आपल्यातील संवेदनशीलता दाखवून दिली.
राज्यातील काही मोजके राजकारणी नागरीकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करतात. विखे पाटील परीवाराने जनता दरबाराची प्रथा अनेक वर्ष जोपासत नागरीकांशी बांधिलकी जोपासली आहे.
महीन्यातून एकदा आशा जनता दरबाराचे आयोजन मंत्री विखे पाटील यांच्या कडून केले जाते. मतदार संघासह जिल्ह्यातील नागरीक आणि कार्यकर्ते आवर्जून या दरबारात येवून आपल्या समस्या विखे पाटील यांच्या कानावर घालतात. शक्य असेल तिथेच संबंधित विभागाच्या अधिका-यांना या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या सूचना दिल्या जातात.सार्वजनिक प्रश्नाच्या संदर्भात योग्य समन्वय साधून नागरीकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न मंत्री विखे पाटील यांच्या आशा दरबारातून होत असल्याने अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नामध्ये योग्य मार्ग निघत असल्याचा अनेकांचा अनुभवच या दरबाराचे फलित असल्याचे नेहमीच बोलले जाते.
रविवारी आयोजित करण्यात आलेल्या दरबारात राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या कार्यालयात तब्बल आठ तास थांबून रात्री ११ वाजेपर्यत त्यांनी शेवटच्या माणसाचे निवेदन स्विकारत दिलासा दिला. प्रत्येक कागद वाचून त्यांनी काही नागरीकांच्या अर्जावर स्वत:सूचना लिहीत प्रश्नाचे गांभीर्य प्रशासनाच्या लक्षात आणून दिले.
मंत्री विखे पाटील यांच्याकडे काम घेवून गेले की न्याय मिळतो हा विश्वास असल्यानेच त्यांच्या जनता दरबारला होणीरी गर्दी लक्षणीय असते.रविवारी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात भेटणार्या लोकांच्या गर्दीचा उच्चांक झाला.दोन वाजता सुरू झालेल्या दरबारात रात्री अकारा वाजता रांगेतील शेवटच्या माणसाचा अर्ज स्विकारत संवेदनशीलता दाखवून दिली.
समस्या घेवून येणा-या कोणत्याही नागरीकाला न्याय देणे ही भूमिका सार्वजनिक जीवनात काम करताना आपण कायम ठेवली. प्रश्न व्यक्तिगत असो की सार्वजनिक तो मार्गी लागणे महत्वाचे असते. यासाठी प्रशासनातील आधिकारी आणि नागरीक यांच्यात योग्य समन्वय साधून प्रश्नांच्या सोडवणूकीचा प्रयत्न आपण नेहमीच करीत असतो. या माध्यमातून जनतेलाही एक विश्वास आणि समाधान मिळते.