Saturday, May 18, 2024

मंत्री राधाकृष्ण विखे यांना ‘मॅट’चा दणका, जामखेडचे गटशिक्षणाधिकारी धनवे यांच्या बदलीला स्थगिती

नगर जिल्हा परिषदेत उपशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेले बाळासाहेब धनवे यांची पालकमंत्री विखे-पाटील यांनी केलेल्या तक्रारीनंतर जामखेड येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून बदली करण्यात आली होती. या बदलीविरोधात धनवे यांनी ‘मॅट’मध्ये आव्हान दिले होते. याच्या सुनावणीदरम्यान बदलीमध्ये मंत्र्यांचा हस्तक्षेप असल्याचे नमूद करीत मॅटने पालकमंत्री विखे यांच्यावर ताशेरे ओढत धनवे यांच्या बदलीला स्थगिती दिली आहे.

बाळासाहेब धनवे हे पूर्वी राहुरी येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांच्याविरोधात अनेक शिक्षक संघटना, महिला शिक्षक संघटनांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर धनवे यांची बीड येथे बदली झाली. तेथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पैसे स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडल्यानंतर धनवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

निलंबनाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर धनवे यांना पुणे येथे साईड पोस्टिंग देण्यात आली. तेथील कालावधी पूर्ण झाल्यावर विनंतीवरून धनवे यांना नगर जिल्हा परिषदेत उपशिक्षणाधिकारी म्हणून नेमण्यात आले. नगर येथे कर्तव्य बजावत असताना त्यांनी प्रवरा शिक्षण संस्थेमधील अनेक बाबी उघडकीस आणल्या. विद्यार्थी संख्या तपासल्यामुळे अनेक शिक्षकांची पदे कमी झाली. याचा राग धरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी धनवे यांच्याविरोधातील राहुरी येथील तक्रारी आणि लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे न्यायप्रविष्ठ बाबींचे पुरावे एकत्र करून शिक्षणमंत्र्याकडे लेखी तक्रार करून धनवे यांची नगरवरून जामखेडला बदली केली.

जामखेडमध्ये धनवे सतत विखे यांच्या विरोधात काम करत होते. विखे यांच्यामुळे बदली झाल्यामुळे धनवे यांनी बदलीविरोधात मॅटमध्ये धाव घेत याचिका दाखल केली होती. याच्या सुनावणीदरम्यान धनवे यांनी सर्व बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. न्यायालयाने आदेशात मंत्र्याचा हस्तक्षेप असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आणि केलेल्या बदलीवर ताशेरे ओढून धनवे यांची बदली रद्द केली. त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना चांगली चपराक बसली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles