भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर काल पुण्यात मराठा आंदोलकांनी चप्पलफेक केली. या प्रकरणानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. या घटनेनंतर काही ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. तर या प्रकणावर प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे
राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान बारामती येथील विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी गोपीचंद पडळकर चप्पलफेक प्रकरणावर भाष्य केलं.
‘प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार असतो. असे जे प्रकार घडत चालले आहेत. असेच जर प्रकार घडत गेले, तर सद्यस्थितीत गंभीर प्रश्न निर्माण होतात’.’काही लोकांच्या भावना होत्या, त्यामुळे ती स्वाभाविक प्रतिक्रिया होती. मात्र आता हा प्रश्न संपलेला आहे. भविष्यकाळात अशा घटना होऊ नयेत यामुळे दक्षता घेतली पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले.