Wednesday, April 17, 2024

तलाठी भरती प्रक्रियेबाबत भ्रष्टाचार !रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु

अहमदनगर : तलाठी भरती प्रक्रियेबाबत भ्रष्टाचार झाला असल्याची टीका रोहित पवार यांनी केली होती. त्यावरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे आता पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु असल्याचं विखे म्हणाले आहेत. अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

यावेळी बोलतांना विखें म्हणाले की, “तुम्ही एखादं बेताल वक्तव्य करता, मात्र जाहीरपणे त्याचे पुरावे मांडा, तुम्ही कोणाचे नातेवाईक आहे म्हणून तुम्हाला काहीही बोलण्याचे लायसन्स मिळालेलं नाही. पूर्वी आजोबा विधान करायचे आता नातवान परंपरा पुढे नेण्याचे ठरवले आहे. आम्ही महसूल विभागामार्फत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु केलेली आहे. त्यामुळे पुरावे द्या अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जा असा इशारा” राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles