राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील काल बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात दौऱ्यावर होते. यावेळी थोरात समर्थक असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच ठिकठिकाणी विखे पाटलांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. काल दिवसभर निलेश लंके आणि शरद पवारांची भेट चर्चेत राहिली होती. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भेटीवरून विरोधकांवर निशाणा साधला आहे.
संगमनेर तालुक्यातील विविध गावात तब्बल 145 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन विखे पाटलांनी काल केलं. खांबे येथील सभेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना निलेश लंके आणि शरद पवार यांच्या भेटीवर देखील भाषणातून निशाणा साधलाय. तसेच स्वतःला जाणता राजा म्हणवणाऱ्यांनी पाच वर्षांपूर्वी असाच प्रयोग करून पाहिला होता, अशी टीका देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
समोर कोण उभं राहिलं याचा मी फार विचार करत नाही. पाच वर्षांपूर्वी सुद्धा स्वतःला जाणता राजा म्हणवणाऱ्यांनी हा प्रयोग करून पाहिलाय. त्यावेळी तर आमच्या थोरल्या बंधूंना आमच्या विरोधात भाषण करायला लावली. लोकांचे घर फोडायचा यांचा धंदा आहे. मात्र आज त्यांचच घर फुटलं.परमेश्वराच्या दारात हे फेडावच लागतं. लोक विखे पाटलांना पाहून नव्हे तर भाजपच्या नेतृत्वाला पाहून मतदान करतात, असं विखे पाटील म्हणाले.
निलेश लंके आणि शरद पवार यांच्या भेटीवर विखे पाटील म्हणाले…
- Advertisement -