Wednesday, June 19, 2024

लोकसभा निवडणुकीबाबत आरबीआयचे माजी गव्हर्नर राजन यांचे मोठे वक्तव्य…भाजपाचा पराभव झाला तर…

भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनो अथवा न बनो, भारत आपल्या आर्थिक धोरणांनुसार पुढे चालत राहील. या निवडणुकीच्या निकालाचा देशाच्या आर्थिक धोरणांवर काहीच परिणाम होणार नाही.मोदी सरकारच्या धोरणांविरोधात सातत्याने आवाज उठवणारे अर्थतज्ज्ञ रघुराम राजन सध्या अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये अद्यापनाचं काम करत आहेत. या विद्यापीठात रघुराम राजन हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. राजन यांनी नुकतीच ब्लूमबर्ग टीव्हीला एक मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भारताची आर्थिक धोरणं, निवडणुकीचे त्यावरील परिणाम आणि आगामी वाटचालीवर भाष्य केलं.

रघुराम राजन म्हणाले, भारताच्या आर्थिक धोरणांमध्ये सातत्य आहे. भारतात जे सरकार येईल ते त्यांच्याबरोबर काही नव्या गोष्टी घेऊन येईल. तसेच नवं सरकार लवकरच अर्थसंकल्पाची घोषणा करू शकतं. स्थगित असलेली शासकीय कामं आता पुन्हा सुरू होतील. नवं सरकार कोणत्या नव्या गोष्टी करेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मोदी सरकारने यापूर्वी देशातील पायाभूत सुविधांकडे लक्ष देणं आवश्यक होतं. मोदींच्या सरकारने यासाठी देशाच्या तिजोरीतून पैसे काढायला हवे होते, खर्च करायला हवे होते. त्यामुळे नव्या सरकारला यावर लक्ष द्यावं लागेल, यासह पायाभूत सुविधांच्या दर्जाकडेही पाहावं लागेल. तसेच याचा फायदा केवळ मोठ्या कंपन्यांनाच न मिळता लहान कंपन्या आणि छोट्या व्यापाऱ्यांनाही मिळायला हवा.

दरम्यान, यावेळी रघुराम राजन यांनी ते राजकारणात येणार का? काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल काय वाटतं? अशा प्रश्नांवरही उत्तरं दिली. राजन म्हणाले, “मी राजकारणात येऊ नये असं माझ्या कुटुंबातील लोकांना वाटतं. राजकारणात येण्यापेक्षा मला शक्य होईल तेवढं मार्गदर्शन करायला मला आवडेल. मी याआधीही वारंवार सांगितलं आहे. परंतु, लोक माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. मी स्वतःही राजकारणात येऊ इच्छित नाही. मी सरकारमध्ये आहे किंवा नाही याची मला पर्वा नाही. मात्र, सरकारच्या आर्थिक धोरणांवर मी बोलत राहतो आणि हाच माझा प्रयत्न यापुढेही असेल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles