Wednesday, April 17, 2024

हे घराणं दहा घर फिरलेलं आहे… राहात्यात उध्दव ठाकरेंनी घेतला विखे पाटलांचा समाचार

नगर : हे घराणं दहा घर फिरलेलं आहे, तुमच्या आशीर्वादाने आमची सत्ता आल्यावर यांच्या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी लावणार असल्याचा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विखे पिता पुत्राचे नाव न घेता दिला आहे. जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने उद्धव ठाकरे सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील दौरा करत आहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांसह जनतेशी संवाद साधत आहेत. विखे पाटलांच्या मतदारसंघातील राहता शहरात झालेल्या जनसंवाद मेळाव्यात ठाकरेंनी तुफान फटकेबाजी केली.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की यांच्या वडिलांना शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यात पहिल्यांदा मंत्री केलं पण तेही ते विसरले. मात्र, जिथे सत्ता तिथे आम्ही अशी यांची सवय पण आता कुठे जाणार? कारण भाजप त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या ठिकाणी असून पुढची सत्ता आमच्याकडे येणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादी वाल्यांना विचारतो ते परत आले तर तुम्ही त्यांना घेणार का? मी तर त्यांना घेणारच नाही आणि तुमच्या आशीर्वादाने सरकार आल्यावर त्यांच्या सगळ्याच भ्रष्टाचाराची चौकशी लावणार आहे. तुम्ही उतमात करत आहे तुम्हाला वाटत असेल कोणी विचारणार नाही पण असं नसतं. दिवस सगळे सारखे नसतात दिवस बदलत असतात आज तुम्हाला वाटतं की तुमचे दिवस आहेत पण उद्याचा दिवस हा आमचा आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी विखे पाटलांचा चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी मंचावर खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, भाऊसाहेब वाकचौरे, प्रभाताई घोगरे, काँग्रेसचे सचिन चौगुले आदी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles