Thursday, January 23, 2025

शरद पवार व राहुल गांधी मारकडवाडीला जाणार, ईव्हीएमविरोधात लाँग मार्चची तयारी….

माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान घेण्याच्या निर्णयाबद्दल माळशिरसचे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यासह इतरही १०० हून अधिक ग्रामस्थांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूला, विरोधी पक्ष ईव्हीएमविरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याची तयारी करत आहेत. काँग्रेसने ईव्हीएमविरोधात लाँग मार्च काढण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे या लाँग मार्चची सुरुवात मारकडवाडीतून होणार असल्याची चर्चा होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड व आमदार उत्तम जानकर यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. शुक्रवारी (६ डिसेंबर) जानकरांनी प्रसारमाध्यमांसमोर यावर भाष्य केलं. पाठोपाठ जितेंद्र आव्हाडांनी देखील एक्सवर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे.

आव्हाड यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “ईव्हीएमच्या विरोधात बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मारकडवाडीतील १७ जणांसह अन्य १०० ते २०० ग्रामस्थांच्या विरोधात पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांची ही कृती राज्यभरात खदखदत असणाऱ्या ईव्हीएमविरोधी असंतोषाला अजूनच चालना देणारा ठरेल यात वाद नाही. परिणामी संपूर्ण राज्यात ‘मारकडवाडी पॅटर्न’ राबवायला सुरुवात होईल, याची मला खात्री आहे. येत्या रविवारी (८ डिसेंबर) शरद पवार मारकडवाडीला भेट देणार आहेत. राहुल गांधी देखील ईव्हीएमविरोधात लाँगमार्च मारकडवाडी येथूनच काढणार आहेत. लोकशाहीला मारक ठरणाऱ्या ईव्हीएमविरोधातील ही ठिणगी देशभर पसरो. क्रांतीचा एल्गार होवो!”

https://x.com/Awhadspeaks/status/1865105681243656232?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1865105681243656232%7Ctwgr%5E309f7c231ef047e67cc37d095d2fbec2a59de8d7%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra%2Fjitendra-awhad-ncp-says-rahul-gandhi-long-march-against-evm-from-markadwadi-sharad-pawar-asc-95-4755899%2F

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles