Tuesday, May 13, 2025

लग्न कधी करणार? कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना विचारला प्रश्न; सांगितली ‘मन की बात’

काँग्रेसचे नेते राहुल गांधी कधी लग्न करणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. आता तुम्हाला पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर स्वत:राहुल गांधी यांनी दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायबरेली येथे राहुल गांधी यांची प्रचार सभा झाली. या प्रचार सभेनंतर राहुल गांधी यांना कार्यकर्त्यांनी ते लग्न कधी करणार? हा प्रश्न विचारला. कार्यकर्त्यांना पडलेल्या या प्रश्नावर उत्तर देताना राहुल गांधी यांनी त्यांच्या मनातील गोष्ट सांगितली.

रायबरेली येथील प्रचारसभा संपल्यानंतर कार्यकर्त्यांनी गर्दी करत राहुल गांधींना लग्न कधी करणार? हा प्रश्न विचारला. गर्दीतून येणारा आवाज ऐकताच राहुल गांधी त्यांच्या बाजूला उभ्या राहिलेल्या लोकांना ते काय बोलत आहेत असे विचारले. तर यावर एकाने लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारत असल्याचे सांगितले. यावर उत्तर देताना राहुल गांधी यांनी ‘आता लवकरच लग्न करावे लागेल.’, असे सांगितले.

राहुल गांधी यावेळी दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. केरळच्या वायनाडमधून ते निवडणूक लढवत आहेत. त्याचसोबत ते उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमधून देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत. रायबरेलीमध्ये २० मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघामध्ये सध्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या जोरदार प्रचारसभा होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles