खासदार राहुल गांधी यांच्या विवाहाचा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय असतो. राहुल गांधी विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत राहुल गांधी लग्न करणार असल्याच्या अफवांना सोशल मीडियावर पेव फुटले आहे. यूट्यूब, एक्स अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही राजकीय विश्लेषक या विषयावर चर्चा करतानाचे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल आणि प्रणिती एकत्र चालतानाचे काही फोटोही मॉर्फ करुन शेअर करण्यात येत आहेत. मात्र याबाबत दोन्ही परिवारांपैकी कुणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. https://x.com/harsht2024/status/1832685388898742561