Monday, March 4, 2024

राहुरी शहरातील वकील दांपत्याचे अपहरण करून खून, आ.संग्राम जगताप म्हणाले…

नगर : राहुरी शहरातील वकील दांपत्याचे अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली. ही निषेधार्थ जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता, यात आ, संग्राम जगताप सहभागी झाले असून त्यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घेत जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांवर पोलिसांनी धाडसी कारवाईची करण्याची खरी गरज आहे तसेच वकील दांपत्याच्या हत्येचा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवावा, सरकारी वकील म्हणून ऍड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, तसेच लवकरच वकिलांचा प्रलंबित असलेला वकील संरक्षण कायदा मंजूर करण्यासाठी अधिवेशनात लेखी स्वरूपाचा प्रश्न उपस्थित करणार आहे. सराईत गुन्हेगारांवर यापूर्वीच पोलिसांनी कारवाया केल्या असत्या तर अशा स्वरूपाच्या घटना घडल्या नसत्या, समाजविघातक लोकांना कायद्याचा धाक दाखवणे गरजेचे आहे, या घटनेचा निषेध करत वकिलांच्या तीव्र भावना शासन दरबारी मांडणार असून तुम्ही जिल्ह्याचे प्रमुख असून या घटनेचा अहवाल शासनाकडे पाठवावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली.
राहुरी शहरातील वकील दांपत्याचा निर्घुण हत्येच्या निषेधार्थ जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात आमदार संग्राम जगताप सहभागी झाले होते, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, मा.नगरसेवक प्रकाश भागानगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे, तसेच जिल्हाभरातील वकील बंधू भगिनी उपस्थित होते,

राहुरी शहरातील वकील दांपत्य खून खटल्याचा निषेध करत विविध मागण्यांसाठी जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने काढण्यात आलेला पायी भव्य मोर्चा जिल्हा न्यायालय, डीएसपी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी वकील बंधू भगिनी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles