नगर जिल्ह्यातील राहुरी येथील आढाव वकील दाम्पत्याची २५/०१/२०२४ रोजी जी निर्घृण अमानुष हत्या झाली, त्या दुःखद घटनेने संपूर्ण महाराष्ट्रातील वकील वर्ग हादरुन गेलेला आहे. महाराष्ट्र राज्यातील वकीलांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढतच आहेत, ही गोष्ट संपूर्ण न्याय व्यवस्थेसाठीच खुप चिंताजनक बाब आहे. तसेच इतर काही राज्यांमध्ये सदरचा कायदा लागू करण्यात आलेला आहे. वकीलांवरील वारंवार होणारे हल्ले लक्षात घेता ‘वकील संरक्षण कायदा लागु होणे हे वकील वर्गासाठी अत्यंत महत्वाचे आहे. त्या दृष्टीने तात्काळ येणाऱ्या अधिवेशनात वकील संरक्षण कायदा मंजूर करावा, व राहुरी येथील आढाव दाम्पत्याची हत्या झाली या खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नेमणूक करावी असे निवेदन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिले. यावेळी अहमदनगर जिल्हा वकील संघटनेचे वकील उपस्थित होते.
वकिल दाम्पत्याच्या खून खटल्यात सरकारी वकील उज्वल निकम यांची नेमणूक करावी, आ.लंकेंचे उपमुख्यमंत्री पवारांना निवेदन
- Advertisement -