Tuesday, February 27, 2024

आम्ही कामे मंजूर करून आणतो आणि ते स्वत:चे फलक लावतात…शिवाजी कडिलेंच्या तनपुरेंवर निशाणा

राहुरी तालुक्यातील निंभेरे-कानडगाव परिसरात अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले निळवंडे धरणाच्या कालव्याद्वारे पाणी मिळाले. या पाण्याचे जलपूजन शिवाजी कर्डिले आणि धनश्री विखे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना कर्डिले म्हणाले, “निळवंडे धरणाचे पाणी निंभेरे-कानडगावमधील शेतकऱ्यांना पाहायला मिळाले, हा क्षण मनाला समाधान देणारा आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे , खासदार सुजय विखे यांच्या माध्यमातून वन विभागाची कालव्यासाठी परवानगी घेतली. युती सरकारच्या काळात या कामाला निधी उपलब्ध केला होता. त्यावेळी अकोले येथे काम करण्यास अडचण होती. म्हणून टेल टू हेड काम सुरू केले. राज्यात पुन्हा सत्ता आल्यानंतर काम जोमाने पूर्ण केले. पाणी जात असताना परिसरातील सर्व ओढे-नाले भरून दिले जातील, असे कर्डिले यांनी सांगितले.

राज्यात सत्ता असताना यांना राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली. तरी देखील विकास कामे करण्यात ते अपयशी ठरले. आमचे सरकार असल्याने आम्ही कामे मंजूर करून आणतो आणि तनपुरे मात्र फलक लावून श्रेय घेण्याचे काम करतात. 53 वर्षांपासून प्रतिक्षा असलेल्या निळवंडे धरणाचे पाणी आज शेतकऱ्यांना पाहायला मिळाल्याचा आनंद होत असल्याचेही शिवाजी कर्डिले म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles