लोकसभेला खासदार शरद पवार यांना मिळालेल्या यशानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे नव्याने कामाला लागले आहेत. त्यांनी एकाच फटक्यात आ. प्राजक्त तनपुरे, खा. निलेश लंके यांसह शरद पवार गटास धक्का दिला आहे.
तनपुरे कारखान्याच्या माजी संचालिका तसेच स्व. रामदास धुमाळ यांच्या स्नुषा शैलजा धुमाळ यांना अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या राहुरी महिला तालुकाध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत अमृत धुमाळ हे नीलेश लंके यांच्यासोबत होते. त्यांनी तनपुरे यांच्या प्रमाणेच लंके यांचे अर्थात शरद पवार गटाचे काम केले. परंतु आता मात्र महिला तालुकाध्यक्ष म्हणून त्यांच्या सौभाग्यवतींच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला हा धक्का मानला जात आहे.