सध्या रेल्वेमध्ये एकमागोमाग अनेक भरती होत आहे. नुकतीच रेल्वे एनटीपीसीमध्ये मोठी भरती जाहीर करण्यात आली होती. यासाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. यानंतर आता रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने ५००० पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
रेल्वे भरती बोर्डाने पश्चिम रेल्वेत ५ हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ट्रेड अप्रेंटिस पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी २३ सप्टेंबर २०२४ पासून म्हणजे आजपासून तुम्ही अर्ज करु शकणार आहात.रेल्वेच्या या भरतीबाबत माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. rrc-wr.com या वेबसाइटवर जाऊन तुम्ही ऑनलाइन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोबर २०२४ आहे. मुदतीनंतर अर्ज स्विकारले जाणार नाही.
रेल्वेची ही भरती फिटर, वेल्डर, कारपेंटर, इलेक्ट्रिशियन अप्रेंटिस पदासाठी होणार आहे. RRC WR ट्रेड अप्रेंटिससाठी ५०६६ रिक्त जागा आहेत.ट्रेड अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास केलेली असावी. याचसोबत संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे.
रेल्वे अप्रेंटिस पदासाठी १५ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सूट देण्यात आली आहे. उमेदवारांना १०० रुपयांचे अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. नोकरीसाठी उमेदवारांची निवड १०वी आणि आयटीआयच्या गुणांद्वारे केली जाणार आहे. या नोकरीमध्ये उमेदवारांना १ वर्षासाठी ट्रेनिंग मिळणार आहे. या अप्रेंटिस ट्रेनिंग दरम्यान त्यांना स्टायपेंड दिले जाणार आहे.
सध्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्येही भरती सुरु आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये स्पोर्ट्स पर्सन पदासाठी रिक्त जागा आहे. याचसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.४६ रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी खेळाची आवड असलेल्या आणि प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना नोकरीची चांगली संधी आहे.
Railway recruitment Railway recruitment
Indian Railway Recruitment