बसपेक्षा ट्रेनचा प्रवास हा जास्त सोयीस्कर असतो असं म्हणतात. प्रतिकूल परिस्थितीत मार्ग शोधून काढणाऱ्यांनाच भारतीय म्हणतात. काही प्रवाशांनी भर गर्दीत मस्तपैकी झोपण्याचा एक भन्नाट जुगाड शोधून काढला आहे. हा जुगाड करणारी मंडळी सीटवर बसलेल्या प्रवाशांपेक्षाही आरामदायी प्रवास करताना दिसत आहेत. या अनोख्या जुगाडूगीरीचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही प्रवाशांनी दोन सीटच्या मध्ये एक चादर बांधली आहे. अन् एखाद्या बाळाला पाळण्यात झोपवावं तसं हे प्रवासी त्या चादरीत झोपून प्रवास करत आहेत.
- Advertisement -