राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मुंबईसह उपनगर तसेच कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर पुढील ५ दिवस तुफान पावसाची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
संपूर्ण जून महिन्यात पावसाने राज्याकडे पाठ फिरवली होती. मात्र, जुलै महिना सुरू होताच अनेक भागात पावसाच्या सरी कोसळल्या. मुसळधार पावसाने (Heavy Rain) नदी नाले तुडूंब झाले. त्यामुळे बळीराजाने खरीप हंगामातील पेरणीची कामे आटोपून घेतली.
दरम्यान मागील आठवड्यात राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. परंतु गुरुवारपासून पुन्हा एकदा पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. सध्या मुंबईसह उपनगर, कोकण किनारपट्टी, दक्षिण मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस पडत आहेत.
मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान येत्या ५ दिवसांत पावसाचा जोर आणखीच वाढणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.यापार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर नाशिक, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया येथे पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.
https://x.com/MahaDGIPR/status/1811687416941674842?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1811687416941674842%7Ctwgr%5Eee8a838c8e95d925b467c287005bdfc0b2b0d84f%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fmaharashtra%2Fweather-alert-saturday-13-july-2024-imd-warning-of-heavy-rain-in-today-mumbai-pune-nashik-konkan-vidarbha-and-marathwada-maharashtra-ssd92