Saturday, May 18, 2024

राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर मनसेला गळती; 7 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये कही खुशी कही गमचे वातावरण दिसून येत आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर काही मनसे पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. डोंबिवलीतील मनसेचे पदाधिकारी मिहिर दवते यांच्यासह सात जणांनी राजीनामा दिला आहे. राज ठाकरे यांची बदलती भूमिका कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढल्याने मी राजीनामा दिल्याचे मिहिर दवते यांनी सांगितलं आहे. मनसेच्या सोशल मिडिया ग्रुपवर राजीनामा दिला आहे.
ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर एकीकडे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात उत्साह आहे. तर दुसरीकडे नाराजी देखील व्यक्त केली जात आहे. डोंबिवलीतील मनसे विद्यार्थी सेनेचे शहर संघटक मिहिर दवते यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. दवते यांनी मनसेच्या सोशल मीडियावर राजीनामा दिल्याचं स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे यांची बदलती भूमिका आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढत असल्याने मी राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्यासोबत काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी देखील राजीनामा दिल्याचे दवते यांनी संगितलं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles