राज ठाकरेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली

0
669

मुंबई – राज ठाकरेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली. गुढी पाडव्याच्या जाहीर सभेत त्यांनी मशिदींवरील भोंगे उतरवा नाहीतर त्यापुढे हनुमान चाळीसा लावा अशी भूमिका घेतली. तेव्हापासून राज्यातलं राजकारण अधिक तापलं आहे. परवा औरंगाबादच्या जाहीर सभेत देखील त्यांनी मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचं जाहीर केलं. तसेच या पुढची भूमिका मी ट्विटरच्या माध्यमातून जाहीर करणार असल्याचं सु्ध्दा त्यांनी सांगितलं. औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत त्यांनी राज्य सरकारला 3 तारखेचा अल्टीमेटम दिला होता. आज सकाळी नऊ वाजता राज ठाकरे काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत राहत्या घरी बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते त्यांची भूमिका जाहीर करतील. विशेष म्हणजे इतरवेळी त्यांच्या घराबाहेर ठराविक पोलिस असतात. परंतु सध्या त्यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.