Saturday, December 7, 2024

राज ठाकरेंकडून लोकसभेसाठी महायुतीकडे मनसेने दिला ‘हा’ प्रस्ताव !

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागच्या आठवड्यात सोमवारी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर महायुतीत मनसेच्या रुपाने नवा भिडू येणार का? याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता राज ठाकरे महायुतीत येणार हे स्पष्ट झालं आहे. याचं कारण आहे बाळा नांदगावकर यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

मनसेने तीन जागांचा प्रस्ताव महायुतीसमोर दिला आहे. लोकसभेला मनसे तीन जागा लढवण्यास इच्छुक आहे असं महायुतीला राज ठाकरेंनी सांगितलं होतं. त्यावर चर्चा सुरु होती. आता आम्ही दोन जागा मागितल्या आहेत. यावर राज ठाकरे आणि भाजपात चर्चा सुरु आहे. त्या जागा नेमक्या कुठल्या आहेत हे राज ठाकरे सांगू शकतील. योग्य तो निर्णय पक्षप्रमुख म्हणजेच राज ठाकरे घेतील. असं बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles