Thursday, July 25, 2024

महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीतून लढणार, मनसेला 20 जागा मिळणार?

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. मनसेही विधानसभेच्या तयारी लागली असून 20 जागांसाठी आग्रह धरल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे महायुतीला जागावाटपाची मोठी कसरत करावी लागणारेय. मनसेनं कोणत्या जागांवर दावा सांगितलाय आणि महायुतीची कशी डोकेदुखी वाढणार आहे

लोकसभेचा धुराळा शांत झाल्यावर आता विधानसभेसाठी सर्व पक्ष सज्ज झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेली मनसे विधासभेसाठी मात्र ताकदीनीशी मैदानात उतरणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य जागावाटपाबाबत भाजपशी बोलणी सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनसेने राज्यात विधानसभेच्या 20 जागांची मागणी केली आहे. मनसेने दावा केलेल्या बहुतांश जागा मुंबई आणि परीसर, तसंच पुणे आणि नाशिकमधल्या आहेत. यामध्ये वरळी, माहीम, शिवडी, मागाठाणे, दिंडोशी, जोगेश्वरी, वर्सोवा, घाटकोपर पश्चिम, चेंबूर, ठाणे, भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण, नाशिक पूर्व, वणी, पंढरपूर, संभाजीनगर मध्य आणि पुण्यातील काही जागांचा समावेश आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles