अमरावतीत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं. “जानेवारीत पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे राहणार नाहीत’ असं राज ठाकरे म्हणाले.”राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर ते चुकीचं आहे. महिलांना अशा प्रकारे पैसे न देता राज्यात नवीन उद्योग आणा” असं म्हणत राज ठाकरेंनी या योजनेवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.
सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना तयार केल्या जात असतील तर त्याचा राज्यावर परिणाम होईल.
राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर हे चुकीचं आहे.
महिलांना अशा प्रकारे पैसे न देता राज्यात नवीन उद्योग आणले पाहिजे, रोजगार दिला पाहिजे.
समाजातील कोणताही घटक फुकट काही मागत नाही.