राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम दिला असून सध्या त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अशा प्रकारचे कोणतेही आरक्षण मिळणार नाही, हे मी आधीच स्पष्ट केले आहे. जरांगेच्या पाठीशी कोण? हे लवकरच स्पष्ट होईल.. असे मोठे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन सध्या राजकीय चर्चा रंगल्या आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज (गुरूवार) ठाणे दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरुन मोठे विधान केले आहे. अशाप्रकारे कोणतेही आरक्षण मिळणार नाही, असे काही घडणार नाही हे मी आधीच त्यांच्या समोर स्पष्ट केले असल्याचे ते म्हणाले.
तसेच “यामागे जरांगे पाटील आहेत की त्यांच्या मागे कोण आहे? ज्यामधून जातीयवादातून महाराष्ट्र डिस्टर्ब करायचा प्रयत्न आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हे घडत असून दिसतयं इतकं सरळ चित्र नाही यामागे कोण आहे हे लवकरच स्पष्ट होईल..” असेही राज ठाकरे म्हणाले.