अभिनेता रितेश देशमुख यानं चाहत्यांना आणि शिवप्रेमींना शिवजयंतीनिमित्त एक खास भेट दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर लवकरच एक चित्रपट येणार असून तो स्वत: या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.चित्रपटाचा फर्स्ट लुक त्यानं आज या खास दिवशी शेअर केलाय. त्यानं लिहिलं की,इतिहासाच्या गर्भात, एक अशी आकृती जन्माला आली जीचं अस्तित्व नश्वरतेच्याही पल्याड होतं. एक प्रतिमा, एक आख्यायिका, जे धगधगत्या प्रेरणेचं चिरंतन अग्नीकुंड होतं. छत्रपती शिवाजी महाराज.. फक्त इतिहासपुरुष नाहीत. ती एक भावना आहे, असामान्य शौर्याचा पोवाडा आहे, साडे तिनशे वर्षांपासून.. प्रत्येकाच्या मनामनात उगवणारा आशेचा एक महासूर्य आहे.शिवरायांची महागाथा भव्य पडद्यावर जिवंत करता यावी अशी आमची दुर्दम्य महत्वाकांक्षा होती. एका प्रतापी पुत्राच्या महागाथेचा प्रवास ज्याने एका महाकाय सत्तेला उलथवत आणि स्वराज्याचा धगधगता वणवा पेटवला. एक रणधुरंधर, जिथे शौर्याला सिमा नाही. ज्यांनी जमिनींवर नाही रयतेच्या मनामनांवर राज्य केलं …आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मुखी ज्यांचं नाव आहे….’राजा शिवाजी’.
रितेश देशमुखची मोठी घोषणा, ‘राजा शिवाजी’ सिनेमाची घोषणा, स्वत:च करणार दिग्दर्शन
- Advertisement -