Wednesday, April 17, 2024

आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीच काँग्रेसला मोठा धक्का; ३२ नेत्यांचा भाजप प्रवेश

आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीच राजस्थान काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे जवळचे नेते माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते लालचंद कटारिया यांच्यासहित ३२ नेत्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीच राजस्थान काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे जवळचे नेते माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते लालचंद कटारिया यांच्यासहित ३२ नेत्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी आणि केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.
राजस्थानमधील अनेक काँग्रेस नेत्यांनी पक्षाची साथ सोडली आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये जाट नेत्यांचा सामावेश आहे. काँग्रेस नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजपच्या गोटामध्ये उत्साह दुणावला आहे. यामुळे भाजपने राजस्थानने पुन्हा एकदा २५ पैकी २५ जागा जिंकण्याचा दावा केला आहे.काँग्रेसला सोडून भाजपमध्ये प्रवेश करणारे लालचंद कटारिया यांच्यासहित गहलोत यांच्या कार्यकाळातील मांजी मंत्री राजेंद्र यादव , माजी आमदार रिछपाल मिर्धा, खिलाडीलाल बैरवा, आलोक बेनीवाल, विजयपाल मिर्धा, रामपाल शर्मा यांचा सामावेश आहे.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कटारिया म्हणाले, मुख्यमंत्री यादव यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला नवीन ओळख मिळवून दिली आहे’.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles