राजस्थान मधील चुरूचे खासदार राहुल कासवान यांनी भारतीय जनता पक्षाला राम राम ठोकला आहे. सोमवारी ११ मार्च रोजी त्यांनी दिल्लीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्ष सोडल्यानंतर राहुल कासवान यांनी भाजपावर अनेक गंभीर आरोप केले. भाजपा सरंजामशाहीचा पक्ष बनला आहे. देशातील गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेच्या व्यथा ऐकून घेणारे भाजपामध्ये कोणी नाही, असंही कासवान म्हणालेत. देशातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या हक्काच्या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत, मात्र भाजपा शेतकऱ्यांच्या आवाजाकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळेच काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांना आता चुरूमधून काँग्रेसचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. हिसारचे खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी रविवारी भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये सामील होण्याचं ठरवल्यानंतर कासवानांच्या या निर्णयामुळे विरोधी पक्षाला एक वेगळीच ताकद मिळाली आहे.
भाजपच्या २ विद्यमान खासदारांचा राजीनामा… कॉंग्रेसमध्ये प्रवेश, भाजपवर टीका
- Advertisement -