महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा कृषीरत्न पंजाबराव देशमुख पुरस्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते घेण्यास बारामती कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी नकार दिलाय. छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले दांपत्यासंदर्भात कोश्यारी यांनी केलेली वादग्रस्त विधाने लक्षात घेता त्यांच्या हातून पुरस्कार घेण्याऐवजी मी कार्यालयात जाऊन तो स्वीकारेल असं राजेंद्र पवार यांनी म्हटलंय.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे वडील आणि बारामती कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हातून पुरस्कार घेण्यास नकार दिला आहे. महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाने राजेंद्र पवार यांना कृषीरत्न पंजाबराव देशमुख पुरस्कार जाहीर केलेला आहे. “हा आज पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते होणार आहे. पण ज्या महान व्यक्तीच्या नावाने हा पुरस्कार आहे त्या व्यक्तीने भारतातील शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्यानंतरच्या मंत्रीमंडळामध्ये प्रचंड कार्य केलेलं आहे. अशा व्यक्तीच्या नावाने हा पुरस्कार आहे,” असं सांगताना तो राज्यपालांच्या हस्ते स्वीकारण्याची आपली इच्छा नाही असं राजेंद्र पवार म्हणालेत.
ok






