Wednesday, April 17, 2024

जर मी तेव्हा राजकारणात आलो असतो तर… व्हायरल पत्रावर राजेंद्र पवारांची सूचक प्रतिक्रिया

व्हायरल झालेल्या पत्रावरुन एबीपी माझाशी बोलताना राजेंद्र पवार म्हणाले की, जर मी तेव्हा राजकारणात आलो असतो तर तेव्हाच आताची परिस्थिती निर्माण झाली असती. 1990 च्या दरम्यान मी राजकारणात आलो असतो पण नाही आलो. ज्यावेळी लोकांना दडपशाही झाली असं वाटतं तेव्हा लोक निनावी पत्र वाटायला सुरुवात करतात, असं मला वाटतं. काही बारामतीकरांची खदखद या पत्रातून बाहेर पडत आहे. अजित पवार आणि मी दोघंही एकाच वयाचे आहोत. 1987 नंतर अजित पवार राजकारणात आले. त्यानंतर ते पुढे गेले. मी शरद पवाराचा पुतण्या आहे. त्यामुळे लोकांना असं वाटलं असेल की मलादेखील राजकारणाची आवड आहे. पण मी परदेशातून आल्यानंतर शेती करत होतो. मी सतत राजकारणात राहिलो असतो तर शेतीकडे दुर्लक्ष झालं असतं. मात्र मी सामाजिक कामं करत राहिलो. बारामती अॅग्रोचं काम पाहिलं. व्यावसायाचा पाया पक्का केला. त्यानंतर रोहित पवारांना हा पक्का केलेला पाया मी दिला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles