ट्रक चालकाचं नाव राजेश रावाणी असं आहे. हा व्यक्ती फुड ब्लॉगिंग करतो. आता फुड ब्लॉगिंग म्हणताच स्ट्रीट फूड, विविध हॉटेल्स आपल्या डोळ्यांसमोर येतील. पण लक्षवेधी बाब म्हणजे असे कुठलेही फॅन्सी व्हिडीओ तो शेअर करत नाही. उलट ट्रकनं प्रवास करत असताना फुटपाथवर बसून ते जेवण कसं तयार करतात? हे व्हिडीओ तो शेअर करतो. सुरूवातीला तर त्याचे व्हिडीओ हे फारच रॉ असायचे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं एडिटिंग नसायचं. मात्र या व्यक्तीचा प्रामाणिकपणा नेटकऱ्यांना आवडला अन् त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता या ट्रक चालकाला नुसत्या इन्स्टाग्रामवर ४.१२ लाख नेटकरी फॉलो करतात तर युट्यूबवर १२ लाख फॉलो करतात. जाहिरातींच्या माध्यमातून तो चांगली कमाई करत आहे. जाहिरातींच्या माध्यमातून तो चांगली कमाई करत आहे.