नाशिकमध्ये तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या राजश्री आहिरराव यांनी विधानसभेची जोरदार तयारी चालवली आहे. तहसीलदार म्हणून कार्यरत असताना आहिरराव माझ्या मतदारसंघातील कामांमध्ये हस्तक्षेप करतात, असा आरोप देवळाली मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी केला होता.
आमदारकी लढवयाचीच अशी इच्छा असलेल्या आहिरराव यांनी प्रशासनाला आपला राजीनामा सादर केला. दोन महिन्यांपूर्वी राजीनामा मंजूर झाला तेव्हांपासून आहिरराव मतदारसंघात मतदारांच्या भेटीगाठीसह प्रचारही करीत आहेत. अद्याप त्यांनी पक्ष प्रवेश केला नसला तरी लवकरच त्या भाजपामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पुरेसा वेळ हातात आहे. प्रशासकीय जबाबदारी असताना काही कामे करताना अडचणी येत होत्या. आता त्याही दूर झाल्या आहेत. पक्ष प्रवेशाबाबत लवकरच सर्व स्थिती स्पष्ट होईल. मात्र, माझे मतदारसंघातील काम सुरूच असल्याचे राजश्री आहिरराव यांनी स्पष्ट केले.