राजस्थानातील करणपूर येथे झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रुपिंदर सिंह कुनर यांचा ११ हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने विजय झाला. त्यांनी भाजपचे उमेदवार आणि राज्यमंत्री सुरेंद्र पाल सिंह यांचा पराभव केला.
सिंह यांना ३० डिसेंबरला झालेल्या मंत्रिमडळाच्या विस्तारात राज्यमंत्री म्हणून स्थान देण्यात आले होते. नियमानुसार, मंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून त्यांना सहा महिन्यांच्या आत आमदार होणे भाग आहे.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी करणपूर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार गुरमीत सिंह कुनर यांचे निधन झाल्यामुळे तेथील निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने गुरमीत सिंह यांचा मुलगा रुपिंदर सिंह यांना उमेदवारी झाली. कुनर यांना ९४,९५० तर सिंह ८३,६६७ मते मिळाल्याचे स्पष्ट झाले.