रामा क्वीन राखी सावंत केव्हा आणि कोणता नवीन ड्रामा चाहत्यांसमोर घेऊन येईल, याचा काही नेम नाही. चार वर्षांत दोन वेळा लग्न आणि पतीपासून विभक्त होणारी राखी आता पुन्हा एकदा नवऱ्यासाठी नवस करत आहे. या व्हिडीओमध्ये राखी पावसात उभी राहून आपल्या डोक्यावर अंडी फोडत देवाकडे नवऱ्याची मागणी करताना दिसतेय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये राखी जिमच्या कपड्यांमध्ये पावसात भिजताना दिसतेय. ‘लवकर नवरा मिळू दे, चांगला नवरा मिळू दे’ असं म्हणत तिने स्वत:च्या डोक्यावर पाच अंडी फोडली. पापाराझींनी तिचा हा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
‘या’ कारणामुळे राखी सावंतने भर पावसात स्वत:च्याच डोक्यावर फोडली अंडी..video
- Advertisement -