Wednesday, February 28, 2024

राम मंदिराच्या व्हीआयपी पास मिळवून देण्याच्या नावाखाली ‘अशी’ फसवणूक..

काही दिवसांपासून राम मंदिरात दर्शनासाठी व्हीआयपी पास मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांची ऑनलाइन फसवणूक केली जात आहे. त्यात लोकांना व्हॉट्सअॅपवर बनावट वेबसाइटची लिंक पाठवून ऑनलाईन पेमेंट करण्यास सांगितले जात आहे. या पोस्टचा दाखला देत, सायबर क्राइमने नागरिकांना संशयास्पद लिंकपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.परेश रावल, सुनील शेट्टी व अक्षय कुमार यांच्या सुप्रसिद्ध हेराफेरी या चित्रपटातील डायलॉगचा वापर करून सरकारने एक मजेशीर मीम शेअर केले आहे. त्यातून त्यांनी भाविकांना ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या लोकांच्या जाळ्यात न फसण्याचा इशारा दिला आहे. सरकारच्या सायबर दोस्त नावाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून शेअर केल्या गेलेल्या या पोस्टमध्ये लिहिले आहे की, जर व्हॉट्सअॅपवर राम मंदिरातील व्हीआयपी एंट्रीबाबत कोणतीही लिंक आली, तर त्यावर अजिबात क्लिक करू नका; अन्यथा तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता. त्यामुळे कोणत्याही अनोळखी नंबर किंवा वेबसाइटच्या लिंकवर क्लिक करू नका.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles