मोहीते पाटील आणि त्यांच्या गुडांनी मारकडवाडीतील ग्रामस्थांना धमक्या दिल्या. पोट निवडणुकीचं आव्हान मी स्विकारतो. बॅलेटवर पोट निवडणूक घेण्यासाठी मी तयार आहे, असे राम सातपुते म्हणाले.रणजितसिंह मोहीते पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत पैसे वाटले, त्यांच्या गुंडांनी धमकावले. त्यामुळे माझा पराभव झाला. रणजितसिंह मोहिते पाटील हे सर्व मारकरवाडी प्रकरणाचे मास्टर माईंड आहेत. रणजितसिंह मोहीते पाटील यांच्यावर पक्ष कारवाई करेलच. पण जनाची नाही तर मनाची लाज बाळगून पदाचा राजीनामा द्यावा, असा टोला राम सातपुते यांनी लगावला.
मोहिते पाटील यांचे गुंड मारकड वाडीत दहशत येत करत आहेत. यांचं कोणीही येऊ द्या, आमचे गोपीचंद पडळकर येत आहेत. त्याशिवाय आकलूजमध्ये आम्ही देवेंद्र फडणवीस यांचा नागरी सत्कार घेण्याचा विचार करत आहोत, असे राम सातपुते यांनी सांगितले.
ईव्हीएमचे भांडे फोडायचे असेल तर पवार साहेबांनी सुप्रिया सुळे यांना बारामती येथून राजीनामा द्यायला सांगून मत पत्रिकेवर मतदान घ्यावे. उत्तम जानकर यांचा बळी देण्यापेक्षा सुप्रिया सुळे यांचा राजीनामा घेऊन मत पत्रिकेवर मतदान घ्या, असा सल्ला माजी आमदार राम सातपुते यांनी दिला.
मारकडवाडी गावात देशातील कुठलाही नेता येऊ देत. या सर्व गोष्टींना उतारा म्हणून भाजपकडून येत्या २ दिवसात आमदार गोपीचंद पडळकर यांची सभा होणार आहे. यामुळे मारकडवाडी येथून गोपीचंद पडळकर हे थेट आता शरद पवार यांच्याशी भिडणार आहेत, असे सातपुते यांनी सांगितले.