अहमदनगर -नगर दक्षिणेतील खासदार हा आपल्या दक्षिण भागातीलच पाहिजे असा संदेश हा सर्वांपर्यंत गेलेला आहे अशी मिश्किल राजकीय टिप्पणी करत माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी विद्यमान खा .डॉ . सुजय विखे यांच्या उमेदवारीलाच आव्हान निर्माण केले आहे . शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे सर यांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमानिमित्त अशा राजकीय शालजोड्यातील अनेक टिपण्ण्या ऐकावयाला मिळाल्या. प्रा शशिकांत गाडे यांनी वाढदिवसानिमित्त दिवाळी फराळाचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाभरातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांमध्ये चांगल्याच गप्पागोष्टी रंगल्या . अशाच गप्पागोष्टीत प्रा . राम शिंदे सर सहज बोलता बोलता बोलून गेले की नगर दक्षिणेचा खासदार हा दक्षिण भागातीलच असला पाहिजे.
प्रा शिंदे सध्या दक्षिण भागाचा दौरा करत असल्याचे जाणवत असून ते सर्वांच्या दिवाळ फराळ कार्यक्रमास उपस्थित राहत आहेत. नुकताच आमदार निलेश लंके यांचा पारनेर येथे झालेल्या फराळाच्या कार्यक्रमातही त्यांनी उपस्थिती दाखवली. आजही प्रा शशिकांत गाडे यांच्याही फराळ निमित्त त्यांनी हजेरी लावली असता वैयक्तिक आपले संबंध सर्वां बरोबर चांगले आहेत. त्यामुळे फराळाचे कार्यक्रमाला जाणे हे उचित आहे. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गाडे सरांची लाडू तुला केली या कार्यक्रमासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष माजी आमदार विजय औटी, आमदार निलेश लंके, जेष्ठ नेते राजेंद्र नागवडे, जेष्ठ नेते घनश्याम शेलार, माजी महापौर भगवान फुलसौंदर, साजन पाचपुतेमाजी महापौर अभिषेक कळमकर , शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम,राजेंद्र नागवडे, संदेश कार्ले, प्रविण कोकाटे , शरद पवार , बाळासाहेब हराळ, मार्केट कमिटी माजी संचालक बाबासाहेब खर्से, धनंजय म्हस्के, नंदु पालवे, भाऊसाहेब काळे,,संदिप कर्डीले, रोहीदास कर्डीले, बाबासाहेब गुंजाळ ,संपतराव म्हस्के, डॉ. दिलीप पवार, प्रताप पाटील शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, नगरसेवक गणेश कवडे, अनील बोरूडे , दत्ता कावरे , सचिन शिंदे, संतोष ग्यानप्पा, माजी नगरसेवक दत्ता सप्रे, अशोक बडे, शरद ठाणगे, बाळासाहेब साठे, राजेंद्र भगत, प्रकाश कुलट, प्रविण गोरे, प्राविण कोकाटे, रामदास भोर, शरद पवार सह नगरसेवक सेवक व तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने या फळाचे कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी गाडे सरांना उपस्थित मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी शेलार म्हणाले , प्रा. गाडे सर हे दिलेला शब्द पाळत असतात, मला आमदार करणार हा शब्द दिला आहे तो शब्द या वेळी नक्की पाळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.