“मी सोबत असल्यामुळे महायुतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना घेऊ नये. राज ठाकरेंचा महायुतीला फायदा नाही. अजित पवारांमुळे महायुतीच कोणतंही नुकसान नाही. लोकसभेत आलेल्या 17 जागांमध्ये अजित पवारांचाही वाटा आहे. मात्र, राज ठाकरेंना सोबत घेऊ नका”, असं मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.ते पालघर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. शिवाय, महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरेंच्या अनेक सभाही पार पडल्या होत्या.