महायुतील घटकपक्ष असलेल्या रिपाइं पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज ठाकरेंसंदर्भात मोठं विधान केलंय.महायुतीला राज ठाकरेंची गरज नसल्याचं म्हणत आठवलेंनी राज ठाकरेंना टोला लगावलाय. तसेच महायुतीत मनसेच्या समावेशाला त्यांचा विरोध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. राज ठाकरेंना महायुतीत घेण्यात फायदा नाही. मी असताना त्यांची काय गरज, असं रामदास आठवले म्हणालेत. रामदास आठवलेंनी केलेल्या विधानामुळे मनसे आणि महायुतीतील दुरावा वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना देवेंद्र फडणवीस यांनी बीएमसीच्या निवडणुकीसाठी मनसेसोबत युती करू, असं म्हटलं होतं. त्यावरून पत्रकारांनी रामदास आठवले यांना विचारला होता. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. रामदास आठवले हे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. विधानसभा निवडणुकीनंतर आठवले पहिल्यांदा नाशिक दौऱ्यावर आलेत. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.आठवले म्हणाले की, नाशिक दौऱ्यावर आलो विधानसभा निवडणूक रणधुमाळी संपल्यावर आलो. लोकसभेला नुकसान झाले विधानसभेला यश आले. आरक्षण जाणार हे सांगणाऱ्यांना मतदारांनी उत्तर दिलंय. लाडकी बहिण महिलांनी मतदान केले. संविधान हे राजकारण पलीकडे आहे. संविधान कोणाच्या बापाला बदलता येणार नाही.