रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे शनिवारी निधन झालंय. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. प्रकृती खालावल्यानंतर शुक्रवारी त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिकच खालावली. शनिवारी पहाटे ३.४५ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रामोजी राव यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९३६ रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पेड्डापरुपुडी येथे झाला होता. त्यांनी १९९ मध्ये रामोजी फिल्म सिटीची स्थापना केली होती. येथे दरवर्षी सुमारे २०० चित्रपटांचे चित्रीकरण होते. आत्तापर्यंत येथे जवळपास २००० चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.
यात हिंदी, भोजपुरी, तेलुगु, तमिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली, ओरिया आणि इतर भाषांमधील चित्रपटांचा समावेश आहे. क्रिश-३, जय हो, रोबोट, किस्मत कनेक्शन, सरकार राज, गोलमाल, हिम्मतवाला, चेन्नई एक्सप्रेस आणि दिलवाले इत्यादी हिंदी चित्रपटांचा समावेश आहे.